सोयाबीन भावात घसरण
Krushi News : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शुभारंभालाचा सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या सोयाबीनला 3 हजार 800 ते 4 हजार 200 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळत आहे. मात्र, मिळालेल्या या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडात पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
खरीपातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. नव्याने निघालेले सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी आले असता शुभारंभालाच 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा क्विंटलला दर मिळत आहे.
यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त होत असून, यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.