Namo Shetkari Yojana
namo shetkari installment : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आज खात्यात जमा होणार. ‘नमो’ शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2000 सोडण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील.
पात्र कोणते शेतकरी आहेत ?👇👇
जे शेतकरी ‘पीएम किसान योजनेसाठी ’पात्र आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील, असे सांगितले जात होते.( namo kisan yojana)
केंद्राचा १४ वा हप्ता ८५. ६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या ९३. ०७ लाख झाली आहे. वास्तविक, केंद्राचा १४ वा हप्ता ८५. ६० लाख शेतकऱ्यांना दिला गेला.
त्यापोटी १ हजार ८६६ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले. सध्या राज्य सरकारच्या ‘नमो’ची लाभार्थी संख्या नेमकी किती याबाबत स्पष्टता नाही.
नमो शेतकरी किती लाभार्थी आहेत?👇👇
कृषी विभागाची लाभार्थी पडताळणी (१६ ऑक्टोबरपर्यंत)
– ‘पीएम किसान’च्या १४ व्या हप्त्याचे लाभार्थी : ८५. ६० लाख
– राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : ९३. ०७ लाख