Type Here to Get Search Results !

सोयाबीन आणि कापूस पीक पिवळे पडले आहे, असा करा उपाय...

सोयाबीन रोग आणि कीड 



सध्या होत असलेले पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडत आहे. सोयाबीन पिवळे पडल्यास हरीतद्रव्य कमी होउन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, रोपाची वाढ कमी होते आणि उत्पादन ही कमी होते.त्यामुळे सोयाबीन पिवळे होत असल्यास लवकर प्रतिबंधक उपाय करावे. आज आपण सोयाबीन पिवळी पडण्याची करणे आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत.

सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे :

1) पावसाचे पाणी जमीनीत जास्त दिवस साचुन राहिले तर सोयाबीन पिवळी होते.

2) पाण्याचा कमी प्रमाणात निचरा होणार्या चुनखडीयुक्त जमीनीत सोयाबीन पिवळी होते.

3) जमिनीतील अन्नद्रव्ये उदा. नत्र, लोह व पालाश यांची कमतरता भासल्यानेही पाने पिवळी पडतात. मात्र, पानाच्या शिरा ह्या हिरव्याच दिसतात.

4) तननाशकाची फवारणी करताना प्रमाण कमी जास्त झाल्यावर सोयाबीन वर पिवळे पणा येतो.

5)  काही जमीनीत फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट या अन्नद्रव्याच्या कमतरते मुळे सोयाबीन वर पिवळे पणा येतो.


सोयाबीन पिवळी पडली असे करा व्यवस्थापन 

1) शेतात वापसा होण्यासाठी अतिरिक्त साचलेले पाणी असेल तर ते काढण्याची सोय करावी.

2) झिंक सल्फेट+ फेरस सल्फेटची एकत्र फवारणी करावी…. 

खोडकिडीचा प्राद्रुर्भाव होत असेल तर क्लोरोपायरीफाँस 20 % ( 30 ml ) घ्यावे.

3) 19-19-19 + मायक्रोन्यूट्रीएंट ची फवारणी करावी….

खोडकिडीचा प्राद्रुर्भाव असेल तर क्लोरोपायरीफाँस 20 % ( 30 ml ) घ्यावे.




Tags