जायकवाडी धरण पाणीसाठा बातमी
नाशिक जिल्ह्यातून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची आवक जायकवाडी धरणात सुरूच असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी घेतला जाऊ शकतो. जायकवाडी धरण 80 टक्के भरले असून, 80 टक्के झाल्यावर पाणी सोडण्याच्या हालचाली केल्या जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांना तातडीचे पत्र लिहले असून, संबंधीत यंत्रणांना खबरदारी घेणेबाबत आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, जायकवाडी प्रकल्पात 73.97 टक्के जिवंत पाणी साठा आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असुन त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जायकवाडी धरणात पाणी येत असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे.
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 76 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 29 हजार 859 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1649.020 दलघमी आहे.
मुळा धरण पाणीसाठा अपडेट
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा आता 17000 दलघफू झाला आहे. दरम्यान, मुळा पाणलोटात पावसाचा जोर कमी झाल्याने मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 5769 क्युसेक होता.
नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल आज 17000 दलघफू झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक साठा आहे.