आजचे खाद्य तेल भाव
GST कर स्लॅबमधील बदलांमुळे आज अनेक जीवनावश्यक पॅकिंग वस्तूच्या किमती वाढल्या आहे. यात पीठ, दही, पनीर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे महागाईनं त्रस्त नागरिकांना मोठा झटका बसला आहे. मात्र आता दिलासादायक बातमीही समोर येत आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय अदानी विल्मर कंपनीने घेतला आहे.
अदानी विल्मारने सोमवारी खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर 30 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहेत. कंपनी फॉर्च्युन ब्रँड नावाने आपली उत्पादने विकते. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत 30 रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण
गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या किचनचे बजेट (Kitchen Budget on oil) आता आणखी स्वस्त होणार आहे. तर घराच्या भाजीला स्वस्ताईची फोडणीने चव येणार आहे. खाद्यतेल (Edible Oil maharashtra rates today) लवकरच 30 रुपयांनी स्वस्त (Cheaper edible oil) होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (DFPD) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची (One Liter soyabin oil rate) बाटली आणि पाऊच्या किंमतीत 30 रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market edible oil rates) कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.
दर आणखी कमी होणार
अडाणी समूहाने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात 10 ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर 8 रुपये ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अॅग्री कंपनीने एमआरपीवर 35 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.(soyabin tel rate today) कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत 15 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.( edible oil rates today maharashtra)