Type Here to Get Search Results !

आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करण्यासाठी विशेष मोहीम.

How to link adhar to voter in maharashtra



आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक कसे करावे ?

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम १ ऑगस्ट पासून सुरू राबविण्यात येणार आहे. आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर आधार जोडणीचा उद्देश मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी शोधणे आहे.

आधार आणि मतदान कार्ड नोंदणी अशी होईल

१ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र.६ ब मध्ये भरून देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्र. ६ ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केला जाणार असून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब निवडणूक आयोगाच्या विविध माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


 आधारक्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे. अर्ज क्रं. 6 ब BLO यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनामधूनही अर्ज क्रं. 6 ब गोळा करण्यात येईल. मतदारांकडे आधारक्रमांक नसल्यास अर्ज क्रं. 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र.

आधार मतदान कार्ड ऑनलाइन पण लिंक करता येणार

मतदार यादीत असलेल्या प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्रं. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्रं. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच अर्ज क्रं. 6 ब मा. भारत निवडणूक आयोगाच्या eci.gov.in व मा. मुख्य  निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
मतदारांना Online पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रं. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करून  देण्यात येईल.