राज्यात पुन्हा अवकळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather department)वर्तवण्यात आली होती. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकांणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक जिल्ह्यात काल दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण होते. रात्री अनेक ठिकाणी पाऊस पडला. त्याचा शेतक-यांच्या पीकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या कांदा,गहू आणि द्राक्ष या पिकांना झालेल्या पावसाचा फटका बसला. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल पाऊस झाला आहे.
संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय.महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच अनेक ठिकाणी पावसाची हजेरी देखील असेल.
या जिल्ह्यात होणार पाऊस आणि गारपीठ 👇👇
आज रात्री महाराष्ट्रातील एकूण 18 जिल्ह्यांना हवामान खात्याने गारपीट पावसाचा इशारा दिला असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री ८ मार्च २०२२ महाराष्ट्रातील कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर मुंबईतील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये तसेच नांदेड जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे