Animal Husbandry Dpartment Scheme
पशुसंवर्धन विभाग योजना
महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय करण्यासाठी योजना राबवली जाते. याकरिता 18 फेब्रुवारी पर्यन्त राज्यभरातून तब्बल 7 लाख 98 हजार अर्ज विभागाकडे दाखल झाले होते. या अर्जातील पहिल्या टप्प्यात 17 हजार 242 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी तब्बल 102 कोटी 90 लाख रुपये राज्य सरकारकडून मिळालेले आहेत. पशूसंवर्धन विभागाकडून गेल्या 10 वर्षापासून शेळी गट, गाय-म्हैस गट व एक हजार मांसल पक्ष्याचे कुक्कुटपालन ही योजना राबवली जात आहे. यंदा मात्र भरीव निधि सरकारकडून प्राप्त झाला आहे.
जमा झालेले एकूण अर्ज
पशूसंवर्धन विभागाच्या शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय करण्यासाठी अनुदान मिळणे याकरिता 18 डिसेंबरपर्यंत 7 लाख 98 हजार अर्ज दाखल झाले होते. सर्वाधिक अर्ज हे शेळीपालन अनुदानासाठी होते. तब्बल 2 लाख 64 हजार 55 अर्ज हे शेळीपालन तर गाई-म्हशी घेण्यासाठी 2 लाख 20 हजार 80 व मांसल कुक्कुटपालनासाठी 81 हजार 775 अर्ज हे दाखल झाले होते.
कोणत्या जिल्हाचा समावेश आहे ?
दुधाळ गाई-म्हशीच्या योजनेत पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश नाही तर लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, जालना, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. शेळीपालनासाठी बीड, वाशिम, जालना, यवतमाळ, बुलडाणा, नगर, अमरावती , हिंगोली या जिल्ह्यांमधून सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या अर्जातून ऑनलाइन सोडतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कोणते ?
लाभर्थ्यास स्वताचा फोटो, आधारकार्ड, रेशन कार्ड नंबर, सातबारा, 8 अ, अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला,बँक खाते पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड याशिवाय शैक्षणिक कागदपत्रेही अदा करावी लागणार आहेत.