पाईपलाइन अनुदान योजना
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
PVC पाईप अनुदान या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना (Subsidy for farmers) दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाइप साठी 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 15 हजार रुपये अनुदान दिले जाते. पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला तर जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.
त्याच बरोबर HDPA पाईप साठी 50 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 15 हजार रुपये अनुदान दिले जाते. एचडीपी पाईप साठी अर्ज केला तर जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.
आपण ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते त्यामध्ये आपले नाव असल्यास आपल्याला सुरूवातीला काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ज्याच्या मध्ये आपल्या आधार कार्ड जमिनीचा सातबारा, ८अ, बँकेचे पासबुक व जेथे आपण पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर अथवा महा ई-सेतु केंद्र मध्ये भेट द्या.