Onion rates Today
नगर : नवीन लाल कांद्याची बाजारात आवक वाढल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात कांदा दरात घट झाली आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांच्या आवारात नवीन लाल कांद्याची बेसुमार आवक होत असून सोलापूर बाजार समितीच्या आवारात १२०० ट्रक एवढी उच्चांकी आवक झाली. कांदा निर्यातीला सरकारने चालना द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आजचे कांदा बाजारभाव पहा 👇👇
निर्यात ठप्प, कांदा लागवड वाढली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. उन्हाळ कांद्याची लागवड पुणे, नाशिक व नगर परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर होते.आजचे कांदा बाजारभाव पहा 👇👇
कांद्याची मुबलक आवक
कांदा निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे दरही मिळत नाहीत. घाऊक बाजारात कांद्याची आवक मुबलक होत आहे त्यामुळे कांदा दरवाढीची शक्यता सध्यातरी नसल्याचे कांदा व्यापारी सांगतात. सध्या सर्व बाजार समित्यांच्या आवारात नवीन लाल कांद्याची मुबलक आवक होत आहे.आजचे कांदा बाजारभाव पहा 👇👇
उत्पादन खर्च वाढला
कांदा लागवडीचा एकरी खर्च वाढलेला आहे. शेतमजुरी, फवारणी, वाहतूक असे खर्च विचारात घेतला तर कांद्याला चांगला भाव मिळवा अशी अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. नवीन लाल कांद्याची मुबलक आवक होत आहे.आजचे कांदा बाजारभाव पहा 👇👇
बाजार समिती | जात | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सरासरी दर |
---|---|---|---|---|---|---|
सातारा | — | क्विंटल | 440 | 1050 | 2600 | 1800 |
आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 12160 | 1200 | 3250 | 2250 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 25 | 1450 | 1500 | 1500 |
राहता | लाल | क्विंटल | 1235 | 600 | 2650 | 2200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 15750 | 750 | 2700 | 1700 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 7 | 1450 | 1800 | 1600 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 10 | 750 | 700 | 700 |