Krushi Karj Mitra Yojana 2022
कृषि कर्ज मित्र योजना 2022
शेतकरी दरवर्षी शेतीसाठी अनेक राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका कडून कर्ज घेतात.मात्र शेतकऱ्यांना विहित मुदतीत कागदपत्रं पूर्तता करता येत नाही, पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रं मिळवता येत नाहीत परिणामी ते पीक कर्जापासून वंचित राहतात, खाजगी सावकारांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घेऊन कर्ज बाजारी होतात.
जिल्हा बँके कडून घेतल्या जाणार्या कर्जाचे प्रमाण हे सर्वाधिक असते.सहकारी बँकेकडून ग्रामीण भागात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत शेतीसाठी कर्जाचे वितरण केले जाते.
अनेक शेतकरी हे नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे तसेच ईतर कर्ज घेतात.
हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच ईतर अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. अनेक शेतकर्यांना अशिक्षितपणा तसेच ईतर कारणामुळे अनेक अडी अडचणी येतात.
ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र योजना” सुरू केली आहे. (Krushi Karj Mitra Yojana 2022)
कृषि कर्ज मित्र म्हाणजे जो व्यक्ति शेतकर्याला बंकेकडून कर्ज प्रकरण आणि कागदपत्रे गोळा करण्यास मदत करील असा प्रशिक्षित व्यक्ति होय.
कृषी कर्ज मित्र योजना काय आहे?
- शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान कागदपत्र माहीत नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही.
- अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत सहायकाची म्हणजे मित्राची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे.
- गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे तयार करणे आणि बँक मध्ये सादर करणे यासाठी कृषी कर्ज मित्र हे मदत करतील.
योजनेचे नाव | कृषी कर्ज मित्र योजना |
योजना कोणाची | महाराष्ट्र सरकार |
योजना कोणासाठी | शेतकरी |
योजना कधी सुरू झाली | 2022 |
कृषी कर्ज मित्राची कार्ये काय?
- कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.
- कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल.
सेवासुल्क दर
अ) अल्प मुदतीचे कर्ज :-
१. पहिल्यांदा पीक कर्ज घेणारा शेतकरी :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 150/-
ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज :-
- नविन कर्ज प्रकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 250/-
- कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 200/-
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार झाल्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मान्यता असणार आहे. कृषी कर्ज मित्र कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेकडे सादर केले जाते. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यास सहाय्य व सल्ला देणे याविषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.