Kanda Chal Anudan Yojana
कांदा पीक उत्पादनात भारताचा जगात दूसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रात कांदा पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. परंतु कांदा हा नाशवंत शेतमाळअसल्याने कांदा दिर्घकाळ टिकविणे शक्य होत नाही यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणूक करणे आवश्यक असते.
कांदा चाळ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते त्यासाठी kanda chal anudan yojana योजना ही कृषि विभागामार्फत राबविली जाते.
शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो.
यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
Kandachal Anudan yojana 2022
- कादाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
- 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदान लाभ.
- कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित
कृषि विभागाकडे द्यावा. - वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.
कांदाचाळ अनुदान साठी अर्ज कसा करावा ?
पणन मंडळाचे मुख्यालय/विभागिय कार्यालय /जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.
कांदाचाळीसाठी mahadbt च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरी ने लाभर्थ्यांचीनिवड कडून कांदाचाळ बांधण्यासाठी पूर्वसंमती दिली जाते.