SBI Land Purchase Loan Scheme
sbi जमीन खरेदी कर्ज योजना
आता तुमच्याकडे जमीन नसेल किंवा कमी असेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्ही एसबीआय बँकेच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. भारतीय स्टेट बँक शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता आणि हे कर्ज परतफेड करण्यास 7 ते 10 वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
अर्जासाठी येथे पहा 👇👇
SBI जमीन खरेदी कर्ज योजना काय आहे?
अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा एसबीआयचा उद्देश आहे. याशिवाय शेती करणारे भूमिहीन शेतमजुर सुद्धा जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जमीन खरेदीसाठी कर्ज कोण घेऊ शकतो?
बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांकडे 5 एकरपेक्षा कमी असिंचित म्हणजे जिरायती जमीन आहे. तसेच 2.5 एकर सिंचित म्हणजे बागायती जमीन असणाऱ्यांकडे भू-खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.
अर्जासाठी येथे पहा 👇👇
याशिवाय इतरांच्या शेतात काम करणारे भूमिहीन शेतमजुर सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाचा कर्ज फेडीची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर विचार करू शकते. पण त्यांच्यावर इतर बँकांचे कर्ज असू नये.
किती मिळेल कर्ज
या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर बँक खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीच्या किमतीचे मूल्यांकन करून त्यानंतर जमिनीच्या एकूण किमतीपैकी 85 टक्के कर्ज देऊ शकते. या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे गहाण राहणार आहे. अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात देणार आहे.
अर्जासाठी येथे पहा 👇👇
कर्ज फेडण्याचा कालावधी किती ?
या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष मिळतात. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्याला कर्जाचे हप्ते फेडावे लागतील. तुम्ही 9 ते 10 वर्षात कर्ज फेडू शकता. खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी 1 वर्षाला कालावधी मिळतो. पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाची रीपेमेंट सुरू करण्यासाठी 2 वर्षाचा वेळ दिला जातो.
अर्जासाठी येथे पहा 👇👇