Type Here to Get Search Results !

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022, Majhi kanya Bhagyashree Yojana.

 Majhi kanya Bhagyashree Yojana 2022




आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ते पाहूया. माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकार तर्फे राबवली जाणारी योजना आहे. जर तुम्हाला मुलगी असेल तर आपण या योजनेसाठी पात्र आहात. 

एक मुलगी असेल तर मिळेल 50 हजार रुपये असा करा अर्ज 👇👇

बेटी बचाव बेटी बेटी पढाव या योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशा सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक नवीन योजना तयार केली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ –

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विलीन करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालीलप्रमाणे लाभ देण्यात येणार आहेत.




अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी (Documents):

  1.  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. रेशनिंग कार्ड
  4. सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  5. लाभार्थी मुलींचे आधार का

माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थी पात्रता –

  • जर एकुलती एक मुलगी असेल,किंवा दोन मुली असेल आणि मातेने कुटुंब नियोजन शश्रक्रिया केली असेल, तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
  • जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज कसा करावा?

राज्यातील पात्र लाभार्थी ज्यांना अर्ज करायचा असेल, तर त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पीडीएफ खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावा त्याची लिंक खालील डाउनलोड फॉर्म बटनावर दिलेली आहे. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, आई-वडिलांचे नाव, मुलीची जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागेल.सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मशी जोडून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालय किंवा अंगणवाडी मध्ये जमा करावी लागतील. अशा प्रकारे आपला माझा कन्या भाग्यश्री योजना २०२१ मधील अर्ज करावा लागेल.

अर्ज डाउनलोड करा 👇👇👇

डाउनलोड फॉर्म

.हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात

Tags