Type Here to Get Search Results !

खतांच्या किंमतीमध्ये वाढ

 खतांच्या किंमती वाढल्या


शेतकरी (farmers)  आधीच अवकाळी पावसाने बेजार असून आता  नवीन संकटात सापडलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर (farmers) नवीन समस्या उभी राहिली आहे ती म्हणजे रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना खतांच्या किमतीत झालेली वाढ. खतांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. 

रब्बी हंगामाच्या पेरणी चालू आहेत. आणि या परिस्थितीमध्ये खताच्या किमती वाढल्या आहेत. युरियाचा भाव आणि डीएपी (DAP) खताचे भाव वाढले नाहीत. पण रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या ईतर खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

 खतांच्या किमती किती वाढल्या –

खताचे नाव   आधीचा दर    नवीन किंमत

डीएपी –    1200       1200

युरिया –    266         266

10.26.26 – 1300      1470

12.32.16 – 1300      1470

20.20.0.13 – 1150    1250

15.15.15 -  1250       1400

कोरोनाच्या (corona) काळात केंद्राने (center) रासायनिक खतांच्या किंमती (Prices of chemical fertilizers) वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण लॉकडाऊनमध्ये शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याची (farmers) आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी (farmers) या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर केंद्राने (center) ही किंमत वाढ काही अंशी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा किंमती वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे

Tags