Type Here to Get Search Results !

आणखी तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

 अवकाळी पावसाने राज्यात ढगाळ वातावरण

avakali-paus

महाराष्ट्र राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. आणखी दोन दिवस राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कांदा पिकावर होत असून शेतकर्‍यांचे बरेच नुकसान होत आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने सांगितली आहे आहे.

चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामद्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान अपडेट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ काही भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सरकली. कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात या स्थितीचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. तसेच मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात चक्रीय स्थिती असून समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर होती. त्यामुळे राज्यातील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाडा, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचे प्रमाण राहील.

Tags