सोयाबीनला आले अच्छे दिन
सोयाबीनच्या दरवाढीबाबत सकारात्मक बातमी आहे. आवक कमी असल्याने दरात वाढ तर सुरुच आहे पण ज्या 'स्टॅाक लिमिट' ची भिती शेतरकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये होती ती देखील आता उरलेली नाही. कारण स्टॅाक लिमिट न लावण्याचा निर्णयच आता सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.
सोयाबीन स्टॉक लिमिट न लावण्याचा सरकारचा निर्णय
सध्या सोयाबीनचे दर वाढत असतानाही सोयाबीनची आवक मात्र, मर्यादितच आहे. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची गडबड केलेली नाही. शिवाय दर कमी असतानाही केवळ साठणुकीवर भर देण्यात आाला होता. आता दरात वाढ झाली असतनाही प्रत्येक बाजारपेठेत मर्यादित आवक असल्याने दर हे वाढत आहेत अन्यथा स्थिर राहत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी या फार्म्युला वापरल्याने सोयाबीनला महत्व राहिले आहे. आता तर गरज भासेल त्याचप्रमाणे सोयाबीनची विक्री केली जात आहे. शिवाय भविष्यात अणखीन दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
आता व्यापारी, प्रक्रिया उद्योजक किंवा स्टॅाकिस्ट यांच्यावर सोयाबीन साठवणुकीबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यामुळे सोयाबीनच्या साठवणुकीसाठी मागणी वाढणार असल्याने त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. आतापर्यंत केवळ प्रक्रिया उद्योजक हेच लागेल त्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करीत होते. पण आता भविष्यात दर वाढतील या भितीने अधिकची खरेदी करुन ठेवतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.