शेतकर्यांचे सावकारी कर्ज माफी योजना
या 14 जिल्ह्यातील शेतकर्यांचे सावकारी कर्ज माफ होणार👇
👉👉येथर क्लिक करा👈👈
ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतले होते ते माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तसा जीआर राज्य शासनाने काढला आहे ( savkari karjmaphi yojana 2021)
👉👉या शेतकर्यांची कर्जमाफी होणार👈👈
परवाना धारक सावकाराकडून ज्या शेतकर्यांनी कर्ज घेतले ते राज्य सरकार माफ करणार आहे त्याविषयी संपूर्ण जीआर आणि महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
कोणते शेतकरी पात्र आहे आणि कशी होणार कर्जमाफी यासाठी सविस्तर माहिती पहा 👇
शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना पात्रता
- कर्जदार व्यक्ती ७/१२ धारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास असे कर्ज या योजनेस पात्र राहिल.
- कुटुंबातील एकच व्यक्ती सदर योजनेस पात्र राहिल.
- सदर व्यक्तीने ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे.
- परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र नाही.
- परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेली पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतन धारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेला पात्र नाहीत.
- वरीलप्रमाणे अपात्रता धारण करीत नसल्याबाबत कर्जदार व्यक्तीने उप/सहाय्यक निबंधक यांना हमीपत्र सादर करावे.
- हमीपत्रातील माहिती चुकीची/ खोटी आढळून आल्यास कर्जदार व्यक्ती फौजदारी स्वरुपाच्या कारवाईस पात्र राहील असा हमीपत्रात स्पष्ट उल्लेख असावा.
- ही कर्जमाफी फक्त विदर्भ आणि मराठवाडा मधील 14 जिल्हयासाठी लागू आहे.
हे ही वाचा