Type Here to Get Search Results !

लसीकरण नसेल तर रेशन नाही सरकारी सेवा नाही

 Covid 19 vaccination


लसीकरण नसेल तर रेशन नाही, दाखले नाही

लस घेतल्याशिवाय यापुढे रेशन मिळणार नाही, तसेच विविध प्रकारचे सरकारी दाखले मिळण्यासाठी लसीकरणाचे सर्टिफिकेट आवश्यक आहे, असा आदेश औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान औरंगाबाद मध्ये लसीकरणाचा दर हा 50 टक्के पेक्षा कमी आहे या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा आदेश दिला आहे. 

यापुढे कोणत्याही शासकीय बैठका, शासकीय कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना दुसरा डोस अनिवार्य आहे. शासकीय कार्यालयात प्रवेश देताना दुसरा डोस घेतल्याचा पुरावा दाखवूनच प्रवेश द्यावा.

लसीकरण शिवाय कॉलेज प्रवेश नाही

कॉलेजमध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांची उपस्थिती, कॉलेज उपक्रमातील सहभाग, यासाठी विद्यार्थ्यांनाही लसीकरणाची सक्ती प्रशासनाने करावी. वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची  खातरजमा करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेण्यात यावे, यामध्ये कोणताही कसूर राहता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लस घेतली तरच पगार मिळणार

शासकीय योजनांचा लाभ, आरोग्यसेवा, सरकारी दवाखाने, खाजगी दवाखाने, औद्योगिक वसाहती, उद्योगसमूह या ठिकाणच्या कर्मचारी, कामगारांपासून प्रत्येक व्यक्तीला किमान पाहिला डोस घेतल्याचा पुरावा असल्याशिवाय कोणताही लाभ दिला जाणार नाही, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे शासनाचे ध्येय आहे त्यामुळे 30 नोव्हेंबरच्या आधीच उद्दिष्ट घेऊन प्रत्येक आस्थापनाने कर्मचाऱ्यांची व सामान्य नागरिकांचे लसीकरणाचे नियोजन करा, असे निर्देश शासनाने दिले आहे.

हे पण वाचा 👇

Tags