कोविडनं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 50 हजार रुपये मिळणार
कोविड मुळे मृत्यू झाला नातेवाइकास राज्य सरकार देणार 50 हजार रुपये
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली होती. त्याबाबत शासनानं काम सुरू केलं असून त्यासंबधीचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. लवकर काम पूर्ण करून नीधी नेतेवाईकांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. (covid 19)
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
कोरोनाकाळात लाखो लोक कोरोनामुळे मृत्यू पावलेत. काही अल्पवयीन मुलांनी आई आणि वडील दोन्ही गमावल्यानं अनेकजण अनाथ झालेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. काही वयस्कर व्यक्तींनी कुटुंबातील कमावती माणसं गमावली आहेत. त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांना काहीतरी आर्थिक मदत व्हाही हे लक्षात घेऊन शासनानं आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी योजना आखली आहे
पैसे मिळणेसाठी अटी काय असणार?
हे पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही अटी घातल्या गेल्या आहेत. कोरोनाचे निदान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला असेल असल्यास मदत मिळणार. मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू अशी नोंद नसली पण तरीही अटींची पूर्तता होत असली तरी 50 हजारांची मदत देण्यात येईल.
शासन निर्णय (gr) आला
महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ति कोविड-19 या आजारामुळे मरण पावली, त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकस रु. 50,000/- (पन्नास हजार रु.) इतके सहाय्य अनुदान राज्य आपत्ति मदत निधीतून देण्यास शासनाने परवानगी दिली आहे तसा दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी जीआर काढला आहे.
कोविड 19 सानुग्रह मदत साठी कोणती प्रकरणे पात्र आहेत,
- RTPCR चाचणी Positive अहवाल आलेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास पात्र
- वरील प्रमाणे कोविड-19 प्रकरणात रुग्णाचा मृत्यू घरी झाला तरीही किंवा अशा रुग्णाने आत्महत्या केली तरीही पात्र
- कोविड-19 मुळे रुग्णाचा रुग्णालयात 30 दिवसानंतर मृत्यू झाला असेल तरीही
- ज्या व्यक्तीचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला अशी नोंद जन्म आणि मृत्यू नोंदणी प्राधिकार्याने केली असल्यास पात्र
- Medical certificate and cause of date (MCCD)" मध्ये कोविड-19 मुळे मृत्यू " याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील 1 ते 3 अतीची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे रु 50.000 च्या सहाय्यासाठी पात्र असतील.
कोविड-19 मदत साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
कोविड-19 मदत 50,000 रुपये साठी ऑनलाइन अर्ज
प्रत्येक शेतासाठी रस्ता योजना | येथे क्लिक करा |
SBI मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
सोयाबीन बाजारभाव | येथे क्लिक करा |
आजचे कापूस बाजारभाव | येथे क्लिक करा |