Type Here to Get Search Results !

रासायनिक खतांचे दर वाढले

Chemical fertilizers price incresed

Chemical-fertilizers-price

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी (Chemical fertilizers) रासायनिक खतांशिवाय चांगला पर्याय नाही. यंदा खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. ही सर्व प्रतिकूल परस्थिती असताना त्यातच DAP सारख्या खतांचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खताचे दर का वाढले 

दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर हा वाढत आहे. खत तयार करण्यासाठीचा उत्पादन खर्च वाढल्यामुळेच खताचे दर वाढले असल्याचे स्पष्टीकरण इफको कंपनीनेच दिलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना महागडे खतेच घेऊन रब्बीची पेरणी करावी लागणार आहे.

खताच्या दरात वाढ

रब्बीच्या पिकांसाठी बरेचसे शेतकरी हे डीएपी म्हणजेच 18:46:0 या खताचा अधिकचा वापर करतात. या खताच्या दरातच वाढ झाली आहे. डि-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या किमतीत प्रति बॅग 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे नायट्रोजन-फॉस्फरस आणि सल्फर असलेल्या खताच्या प्रति बॅग मागे 70 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कांदा पिकाचा उत्पादन खर्च वाढणार

उन्हाळी कांदा हे रब्बी हंगामात येणारे पीक आहे. पिकाची चांगली वाढ आणि साईज होण्यासाठी DAP खताचा जास्त वापर केला जातो. डीएपी खताचा दर वाढल्याने आता कांद्याचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. याचा परिणाम ईतर पिकांवरही होणार आहे. 

हे पण वाचा 👇

Tags