Gas Cylinder Price Rise by Rs 265
दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरला कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.
घरगुती गॅस दरात वाढ नाही
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती. भविष्यात मात्र घरगुती गॅस पण वाढण्याची शक्यता आहे.