ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास करा तक्रार
अनेकदा ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. याला आळा घालण्या साठी प्रत्येक कारखान्याने उपाय योजना करावी.
तसेच कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन/व्हॉटसॲप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, असे आदेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिले आहेत.
सर्व साखर कारखान्यांनी अशा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल क्रमांक यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये प्रसिद्ध करावी.
शेतकऱ्यांची लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांचेकडे आल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही करावी.
हे पण वाचा