Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्हा परिषद शेळी गट वाटप योजना 2021 अर्ज सुरू

 sheli gat vatap yojna 

राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडा मधून विशेष घटक योजना राबविल्या जातात , यात लाभार्थ्यांना ७५% अनुदानावर प्रत्येकी १० शेळी १ बोकड अशा शेळी गटाचा लाभ दिला जातो. 


या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन  विभागामार्फत सन २०२१ साठी वैयक्तिक  लाभाच्या खालील योजना साठी अर्ज मागवले आहेत.

 आदिवासी उपयोजना शेळी गट वाटप योजना व एक दिवशीय कुकूटपालन साठी पिल्ले (१००) गट वाटप ई. साठी अर्ज करू शकतात.

 यावर्षी ६७ लाख २१ हजार रुपयाचा अतिरिक्त निधी ची वाढीव तरतूद  उपलबध झाल्यानं नव्याने अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

तरी या योजने साठी जास्तीत  लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे


अर्जाचा नमूना खालील लिंक वरुन डाउनलोड करा.



Tags