खाद्य तेलाचे भाव किती आहे
चालू वर्षी खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. यासाठी आयात शुल्कात कपात केल्याने पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफुल तेलाचे दर लीटरमागे ५ ते १० रुपयांनी उतरले आहेत.
सोयाबीन तेल १० रुपयांनी स्वस्त झाले, असून ते १३५ रुपये दराने विकण्यात येत आहे. तर पाम तेल ५ रुपयांनी कमी होऊन १५० रुपयांनी विकले जात आहे. तसेच सूर्यफुलाचे दर प्रतिलीटर १५० रुपये असे आहेत.
रिफाइंड करणाऱ्या तेल कंपण्याकडे खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. दिवाळी लक्षात घेऊन साठा करून ठेवला जातो आणि जास्त भावात माल विकला जातो.
दरम्यान काही खाद्यतेल रिफाइंड करणाऱ्या मिलने अजून देखील पॅकिंगच्या तेलाचे दर कमी केले नाहीत. सुट्या तेलात मात्र दर कमी होऊ लागले आहेत.
सरकारने आयात शुल्क आणखी कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
हे पण वाचा