Type Here to Get Search Results !

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव

mahila-krushi-yojana


महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा विभाग, धुळे यांनी कृषि महाविद्यालय धुळे येथील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ- मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. असेही त्यांनी यावेळी संगितले.

हे पण वाचा 

Tags