यंदा कापसाचे बाजार तेजीत, मागणी वाढली
यंदा कापसाच्या उत्पादन खर्चात भरपूर वाढ झालेली आहे तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकर्यांना जास्तीत जास्त भावाची अपेक्षा आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कापूस बाजार तेजीत राहण्याची शक्यता आहे. सध्या 6500 ते 7000 पासून कापूस खरेदी सुरू आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले तसेच चीनसारख्या परकीय देशांकडून मागणी वाढत असल्याने कापसाचे भाव तेजीत राहण्याची शक्यता तज्ञाकडून सांगितली जात आहे.
2020 चा पीक विमा पैसे खात्यात जमा होणार आपला जिल्हा पहा
यावर्षी देशांतर्गत बाजारात कापसाचे दर सुधारले आहेत. स्थानिक बाजारात निर्यातीपेक्षा जास्त दर मिळत असल्याने निर्यात कमी होत आहे.
पावसाने खराब झालेला कापूस शेतकरी आता विकू शकतात. मात्र चांगला कापूस उशिरा विकल्यास आठ हजार रुपयांपर्यंतही दर मिळू शकतो असे जाणकार संगत आहे.
शेतकर्यांनी कापूस विकण्यास घाई करू नये तसेच कमी भावात कापूस विकू नये.
हे पण वाचा