Type Here to Get Search Results !

कांद्याचे दर 15 रुपयांनी घसरले

कांद्याचे दर 2500 रुपयापर्यंत घसरले

kanda-bhajarbhav

कांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागाची धाड

पिंपळगाव बाजार समितीमध्ये  कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाने दोन दिवसापूर्वी धाड टाकली होती. याचा थेट परिणाम मार्केटमध्ये झाला असून कांद्याच्या दरात 15 रु घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा 25 रुपये पर्यन्त खाली आला आहे.

.

 आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. 

आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास 18 तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे मार्केटमध्ये नियंत्रण आले असे व्यापर्‍यांकडून संगितले जात आहे.

.

कांद्याचे भाव आले नियंत्रणात

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकणी लाल कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा  उन्हाळ कांद्यालाही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. 

यामुळे देशांतर्गत मागणी पेक्षा पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले होते.

.

त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला आणि ऐन सणासुदीच्या काळात भाव वाढली. याचा काळात आयकर विभागातर्फे 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले. आता मात्र कांदा बाजार भाव सध्या नियंत्रणात आले आहे. 

हे पण वाचा

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात

Tags