NFSM seed subsidy Maharashtra
चालू वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिक लागवड प्रमाण वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारने शेतकर्यांना 38 कोटी रुपये निधि उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत शेतकर्यांना दोन हेक्टर पर्यन्त तर हरभरा बियाणे अनुदान मिळणार आहे.
कृषी विभागाकडून वाटल्या जाणाऱ्या हरभरा बियाणे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन उत्पादन व उत्पादकता वाढवावी असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आवाहन केले आहे.
हरबरा साठी बियाणे अनुदान किती?
या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यावर प्रतिक्विंटल दोन हजार 500 रुपये अनुदान दिले जात आहे.आजपासून 24 ऑक्टोबर हरबरा वितरण सप्ताह राबवण्यात येत आहे शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा. या वेळेस भरपूर पाऊस झाल्यामुळे हरभरा पिकासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत असल्यामुळे पिकासाठी चांगली स्थिती आहे त्यामुळे यावर्षी हरभरा लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा