गहू पीक खतपाणी व्यवस्थापन
गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गव्हाचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी वेळेवर पेरणी, पेरणीची योग्य पद्धत , खताचे समतोल प्रमाण , पीक व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. चला तर पाहूया गव्हाच्या लागवडी बद्दल अधिक माहिती.
गहू पिकासाठी योग्य जमीन कोणती?
- पाण्याचा निचरा होणारी जमीन गहू पिकासाठी योग्य असते.
- हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत खते व योग्य रसायनांचा वापर केला तरीही चांगले उत्पन्न होऊ शकतो.
- गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणे गरजेचे आहे.
- त्यासाठी जमीन खोलवर नांगरट करून हेक्टरी 10 ते 12 टन शेणखत मातीत मिसळावेत.
- जमिनीची २ वेळा कुळवणी करावी.
गव्हाची पेरणी केव्हा व कशी करावी?
गव्हाची पेरणी शक्यतो नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी करावी. त्यांनतर पेरणी केल्यास उत्पादनात घट होते.
- पेरणी करतांना जमिनीत ओलावा नसेल तर जमीन थोडी ओलवून घ्यावी.
- एकरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावेत.
- पेरणी करतांना एकरी एक बॅग DAP किंवा १२.३२.१६. किंवा १०.२६.२६ वापरावे.
- पेरणीसाठी गोदावरी , GW- 496,अजित 102 हे वाण चांगले आहेत.
गहू पिकासाठी बीजप्रकिया कशी करावी?
- पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम या बुरशीनाशकाची 60 ग्राम प्रति 20 किलो बियाणे अशी प्रकिया करावी.
- पाच ते सहा सेमी खोल पेरणी केल्यास उत्तम.
- जमिनीच्या उताराप्रमाणे गव्हासाठी 4 ते 5 मीटर रुंद आकाराचे सारे पाडावेत.
गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन कशे करावे?
- जमीन भारी असेल तर ६ वेळा १८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
- मध्यम जमिनीसाठी ७ वेळा १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- हलक्या जमिनीसाठी ८ ते १० वेळा १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- दोन वेळा पुरतेच पाणी उपलब्ध उपलब्ध असेल तर २० ते २२ दिवसांनी गव्हास पाणी द्यावे.
- तीन वेळा पुरतेच पाणी उपलब्ध असेल तर दर वेळी २० ते २२ दिवसांनी द्यावे.
कापणी केव्हा करावी
गहू पीक पूर्ण पक्व(पिवळे) झाल्यावर गव्हाची कापणी करावी.
उत्पादन किती होते –
सुधारित वाणाचे उत्पादन एकरी १५ ते २० क्विंटल पर्यंत येते.
साठवण कशी करावी?
- गहू उंदीर , घुसी , ओलावा यांपासून दूर अश्या जागेवर साठवून ठेवावेत.
- गहू पत्रा किंवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीत साठवून ठेवू शकता.
- साठवणी पूर्वी गव्हाला २ ते ३ दिवस उन्हात ठेवावेत.
गव्हाची वेळेवर पेरणी, खुरपणी, काढणी केल्यास तसेच गव्हाची पेरणी ते साठवण पर्यंत थोडी काळजी घेतली तर गव्हाचे उत्पन्नात चांगली वाढ होते.
हे पण वाचा