सन 2021 च्या खरीप हंगामास ई-पीक पाहणी मोबाईल वर भरण्यास दि. 14 ऑक्टोबर 2021 पर्यन्त मुदतवाढ
Ipik pahani (epik pahani app)
ई पीक पाहणी अॅप द्वारे शेतकरी स्वतःच्या मोबाईल वरून पीक नोंद करू शकणार आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात दि 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू केला आहे. खरीप हंगामासाठी माहिती भरण्याची मुदत 30.09.2021 पर्यन्त देण्यात आलेली होती परंतु राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक खातेदारांची नोंदणी अद्याप बाकी आहे. (epik pahani)
दि 30 सप्टेंबर रोजी झ्लेलेल्या बैठकीत सरकारने सन 2021 च्या खरीप हंगामास ई-पीक पाहणी मोबाईल वर भरण्यास दि. 14 ऑक्टोबर 2021 पर्यन्त मुदतवाढ दिली आहे. या सुविधेचा लाभ राज्यातील शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.