मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना
रोजगार हमी योजनेतून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’ असे करण्यात आले आहे
आता प्रत्येक गावात शेत रस्ता होणार, मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राज्य सरकार राबविणार. गावागावात शेत रस्ते तसेच पाणंद रस्ते या योजनेतून बांधण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रिमंडळ समितीने घेतला.
काय आहे योजना
- गावात शेत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात.
- पावसाळ्यातील पीके शेताबाहेर काढताना अनेक अडचणी येयात.
- तसेच या योजनेतून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करण्याचे काम रोजगार हमी योजनेतून होणार आहे.
- या योजनेमुळे सर्वांना आपल्या शेतात जाण्यासाठी पक्के असे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत.
- प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्ते अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत.
योजनेचा उद्देश
राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
हे पण वाचा