Mahadbt online application 2021
महाडीबीटी ऑनलाइन अर्ज सुरू
मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती सर्व योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आणि या अर्जामध्ये आता महत्त्वाचे असे अर्ज सुरू झाले, ते म्हणजेच विहीर अनुदान योजना तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर जुन्या विहीर ची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.
तिसरा येतो अस्तरीकरण म्हणजे तळ्याचे अस्तरीकरण असत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच इनवेल बोअरिंग असेल त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.
नवीन विहीर शेततळे अस्तरीकरण अनुदान किती
या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी जर पाहिले तर अडीच लाख रुपये अनुदान आहे. जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर पन्नास हजार रुपये इतके अनुदान आहे. त्यानंतर येतं इनवेल बोअरिंग. इनवेल बोअरिंग साठी वीस हजार रुपये अनुदान तुम्हाला दिसत आहे.
त्यानंतर येतं पंप संच. तसंच पंप संच साठी सुद्धा वीस हजार रुपये वीज जोडणी आकार, इथं दहा हजार रुपये आहे. आता इथे पाहिले तर शेत तळाचे प्लॉस्टीक अस्तीकरण इथे एक लाख रुपये अनुदान आहे.
ठिबक आणि तुषार सिंचन अनुदान
सुक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन संच रुपये पंन्नास हजार किंवा जर तुषार सिंचन संच साठी पंचवीस हजार असं अनुदान आहे.
हे सर्व अर्ज तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर किंवा जवळच्या सेतु केंद्रामध्ये जाऊन करू शकता. लवकरात लवकर अर्ज करा पात्र लाभार्थी हे लॉटरी पद्धतीने निवडले जातात.