Type Here to Get Search Results !

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर


मुंबई : महाराष्ट्रात जुलै ते ऑक्टोबर 2021 या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप  नुकसान झाले. त्र्यामुळे या  शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अशा नुकसान ग्रस्त  शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यातून जिरायत जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये तर बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

ativrushti-packej

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. तर मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पिक निघून गेले. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. 

सौर कृषि पंप योजना अर्ज सुरू

या संदर्भात महसूल मंत्री बाळासोब थाेरात यांनी सांगितले की, ‘राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेला शेतक-यांना १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 ऑनलाइन अर्ज

छतावरील सोलर साठी अनुदान योजना

ई श्रम कार्ड योजना

Tags