पेट्रोल डिझेल चे दर sms पाठवून कसे पहायचे ?
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबईल वरून एसएमएस (Check Fuel prices via SMS) पाठवून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्याचे सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. नवीन दरांसाठी आपण संबधित वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.
हे ही वाचा- एकदा चार्ज केल्यावर ओला इलेक्ट्रिक बाइक चालते 180 KM
पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज सकाळी 6 वाजता बदलले जातात. तुमच्या शहरात प्रत्येक दिवसासाठी पेट्रोल/डिझेलचे अचूक भाव मिळवण्यासाठी, कृपया "RSP <space> शहराचा कोड" 92249 92249 वर एसएमएस करा. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. हा कोड तुम्हाला www.iocl.com या वेबसाइटवर मिळेल.