नाशिक - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वरमधून विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
गोदावरीच्या पाण्यानं धोक्याची पातळी गाठली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. पात्रातील सर्व पुरातन मंदिरं, कुंभस्थान पाण्याखाली गेले.
नाशिक - गंगापूर धरणातून पाणी सोडणार दुपारी 15 हजार क्युसेकनं विसर्ग सोडला आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
औरंगाबाद - जायकवाडी धरण 95 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडले असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचनादेण्यात आल्या.
धरणात 75 हजार क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. औरंगाबाद - नाथसागरातून पाणी सोडले असल्याने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन नदीपात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाने संगितले.
हे पण वाचा