पुढील चार दिवस या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस . (Maharashtra)
महाराष्ट्रात येत्या चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख ( हवामान तज्ञ अभ्यासक )यांनी सांगितली आहे.
त्यांच्या अंदाजानुसार आज 20 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार तर बर्याच ठिकाणी विजेच्या कडकडटा सह पाऊस झाला.
राज्यात पावसाला पूरक असे वातावरण तयार झाल्याने येत्या चार दिवसात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे.
हे पण वाचा- 2020 चा पीक विमा मंजूर यादी पहा
21 आणि 22 सप्टेंबरला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड. परभणी, नादेड सह अनेक जिल्ह्यात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस होईल.
तसेच लातूर सोलापूर सांगली, उस्मानाबाद, नगर, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे.
त्यामुळे या भागातील शेतकर्यांनी काढणीस आलेली सोयाबीनची काळजी घ्यावी. काढणी झालेले पीक झाकून ठेवावे.
नाव- पंजाब डख, हवामान अभ्यासक, परभणी.
हे पण वाचा-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना