Type Here to Get Search Results !

गुलाब चक्रीवादळ, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मराठवाड्यात पुर

गुलाब चक्रिवादळाने महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातला. अतिवृष्टीने अनेक गावांना झोडपून काढले. गावांचा एकमेकांपसून संपर्क तुटला आहे. राज्यात 5 जिल्हे रेड अलर्ट तर 12 जिल्हे yello अलर्ट जाहीर केले आहे. (gulab chakrivadal)

पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे.

28 आणि 29 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने अलर्ट जारी केला आहे.

यवतमाळ मध्ये पुराच्या पाण्यात एक एसटी बस वाहून गेली, चालक वाहकासह 4 जण वाहून गेले असून बाकीना सुखरूप बाहेर काढले आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढतच गेला. औरंगाबाद मध्येही अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले. मराठवाड्यात अनेक गावात घरांची पडझड झाली असून, हजारो जनावरे वाहून गेली. (Aurangabad)

पुढे वाचा

नाशिक मधील गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरण भरले?

उस्मानाबाद तेरणा धरण भरले असून तेरणा नदीला आलेल्या पुरात 22 जण अडकले होते त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढले.

जळगाव मध्ये पुराच्या पाण्यात 1 जण वाहूनगेला गंगापूर धरणातून 3000 विसर्ग सुरू असून गोदावरी नदीला पुर आला आहे. नाशिक मधील नांदगाव मध्येही नदीला पुर आला आहे.( gangapur dharan overflow)

अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने शेतमालाचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा ईशारा दिला आहे.

हे पण वाचा

ईपीक पाहणी शेवटची तारीख 30 सप्टेंबर वाचा सविस्तर

या जिल्ह्यात आला महापूर


Tags