गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज |Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्याबरोबरच शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारित स्वरुपात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अपघात विमा योजनेसाठी विमाछत्र प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे आई-वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात आलेला आहे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नुकसान भरपाई व पात्रता
सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय आहे:
अपघाताची बाब – नुकसान भरपाई
- अपघाती मृत्यू – रु.२,००,०००/
- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.२,००,०००/
- अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास – रु.१,००,०००/
लाभार्थी पात्रता:-
महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कागदपत्रे
दावा अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे:-
अ) लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे –
विहीत नमुन्यातील पूर्वसुचनेचा अर्ज पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- मृत्यू दाखला
- प्रथम माहिती अहवाल
- विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू. उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- घटनास्थळ पंचनामा
- वयाचा दाखला