FRP ची रक्कम तीन टप्प्यात मिळणार.
ऊस उत्पादक शेतकर्यांना उसाचे FRP चे तुकडे करून पैसे तीन टप्प्यात देण्याचा केंद्र सरकारचा घाट असून त्या साठी हालचाली सुरू आहेत. सध्या ऊस गाळपानंतर 14 दिवसात उसाची एफआरपी ची पूर्ण रक्कम देणे असा कायदा आहे,
परंतु हा कायदा रद्द करून बिलाची रक्कम तीन टप्प्यात म्हणजे ऊस तुटल्यानंतर 60 टक्के रक्कम एक महिन्याच्या आत, 20 टक्के रक्कम चालू हंगामाच्या शेवटी तर उरलेली रक्कम पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी देण्याचा विचार आहे. यासाठी केंद्र सरकारने एक समिति बनवली आहे. (FRP)
पुढे वाचा
या समितीने FRP चे पैसे शेतकर्यांना कसे द्यावेत याबाबत राज्यांकडून प्रस्ताव मागितले आहेत. राज्य सरकरनेही या प्रस्तावास विरोध केलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे. (Raju Shetti)
केंद्र सरकारच्या या निर्णाय विरोधात शेतकर्यांनी ८४४८१८३७५१ या क्रमांकावर मिसकॉल करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असे राजू शेट्टी यांनी ठरवले आहे.