Unorganized Workers e Labor Scheme
ई श्रम योजना काय आहे? (eshtram scheme)
सध्या केंद्र सरकारने घरगुती कामे करणाऱ्या महिलांसाठी , सुतार, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर , भाजी विक्री अश्या अनेक कामगारांसाठी ‘श्रमिक कार्ड योजना’ काढली आहे. त्यामुळे सरकार कडे अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहे त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच अशा कामगारांची व्याप्ती सरकारला कळणार आहे.
श्रमिक कार्ड योजनामध्ये नोंदणी का करावी? (elabour card)
•👉🏻असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
• 👉🏻हा डेटाबेस असंघटित कामगारांसाठी धोरण आणि कार्यक्रमांमध्ये सरकारला मदत करेल.
• 👉🏻अनौपचारिक क्षेत्रापासून औपचारिक क्षेत्रापर्यंत कामगारांच्या हालचाली आणि त्याउलट, त्यांचा व्यवसाय, कौशल्य विकास इ. तसेच, स्थलांतरित
•👉🏻 कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेणे.
•👉🏻 रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे.
ई श्रम योजनेसाठी पात्रता काय आहे
- खालील निकष पूर्ण करणारे प्रत्येक कामगार श्रमिक लेबर कार्ड अंतर्गत नोंदणीसाठी पात्र आहेत:
- वय 16-59 वर्षे असावे
- आयकर भरणारा नसावा
- EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत
- असंघटित कामगार श्रेणीमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे
- कोणतेही काम करणारा असंघटित कामगार या योजनेसाठी पात्र आहे
e Labor Scheme
योजनेचे नाव | ई श्रम योजना |
योजना कोणाची | केंद्र सरकार |
लाभार्थी | असंघटित कामगार |
संपर्क | CSC Center |