ऊसतोड कामगार योजना
महाराष्ट्रातील कामगारांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांने 21 सप्टेंबर 2021 रोजी एक शासन निर्णय काढला आहे. ऊसतोड कामगार नोंदणी केली जाणार.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे.(Gramsevak)
ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून मिळालेल्या प्रमाणपत्राचा वापर होईल.
कुठल्याही दस्तऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी केली नसलेल्या अनेक असंघटित ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. (Ustod kamgar)
योजनेचे नाव | ऊसतोड कामगार नोंदणी |
योजना कोणाची | राज्य सरकार |
लाभार्थी | असंघटित ऊसतोड कामगार |
संपर्क | ग्रामसेवक |
नोंदणी साठी कोण अर्ज करू शकते
राज्यातील जे ऊसतोड कामगार सतत मागील 3 वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत, अशा कामगारांची संबंधित गावातील, वाडीतील ग्रामसेवकांनी नोंदणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत,
ज्या ऊसतोड कामगारांनी अलीकडच्या काळात उसतोडणीचे काम बंद केले मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी याद्वारे करण्यात येणार आहे. (Ustod labour)
ऊसतोड कामगार नोंदणी साठी कागदपत्रे
- आधार कार्ड,
- फोटो,
- बँक खाते,
- रेशन कार्ड
याबाबतचा शासन निर्णय व सोबतच नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म खाली दिला असून, प्रत्येक जिल्ह्यात ग्रामसेवकामार्फत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे.