सोयाबीनच्या भावात दोन हजार रुपये घसरण
सोमवारी लातूरच्या बाजारात सोयाबीन चे भाव 2000 रुपयांनी घसरले.सोयाबीनची आताच काढणी चालू झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच येवढी घसरण पाहून सोयाबीन उत्पादकांना चिंता पडली आहे.(soyabin)
लातूरमध्ये सोयाबीनला 6 हजार 500 रुपये भाव सापडला आहे. मागील आठवड्यात हाच भाव 8 हजार 500 रुपये होता. जुलै महिन्यात सोयबींचे भाव 10 हजार पेक्षा जास्त होते.
त्यावेळेस शेतकरी आनंदी होते. परंतु केंद्र सरकारने खाद्यतेल शुल्कात घट केली आणि परदेशातून 12 लाख टन सोयाबीन पेंड आयात केली, त्यामुळे देशभरात सोयबीनचे भाव पडण्यास सुरुवात झाली.
हे पण वाचा- शेतकरी बंधूंना आनंदाची बातमी, 2020 चा पीक विमा पैसे खात्यात जमा होणार
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन जास्त प्रमाणात दाखल होऊन आणखी भाव पडण्याची शक्यता आहे. त्यातच ओलाव्याचे प्रमाण आणि मातीचे प्रमाण यामुळे आधीच सोयाबीन कमी भावात विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
शेतकर्यांनी सोयाबीन चांगली वाळवून मगच विकण्यास न्यावी. बाजार भावापेक्षा कमी भावात सोयाबीन व्यापार्यास देऊ नये.
हे पण वाचा- पुढील चार दिवस या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस