नाशिक मधील धरणे ओवरफ्लो ! मुळा धरणात जोरदार आवक सुरू.
Dam overflow in Nashik! Godavari river was flooded. The Mula dam started coming in strongly.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, मुंबई ( mumbai) तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी 13 ,14 व 15 सप्टेंबरला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल. असा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे.
मराठवाडा व विदर्भ भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे . नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ चालू असून गेल्या 24 तासात नाशिक मधील गंगापूर, कडवा, दारणा वालदेवी ही धरणे ओवर फ्लो झाली आहेत. (Gangapur, nashik )
या धरणातून गोदावरी नदीत 28 हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. नाशिक मधील गोदावरी नदीला पुर आला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( Godavari )
अहमदनगर जिल्ह्याचे वरदान मानले जाणारे मुळा धरणातही पाण्याची जोरदार आवक चालू आहे. आज 13 सप्टेंबर रोजी धरणातील पाणीसाठा 23000 दलघफूट पेक्षा जास्त झाला असून अशीच आवक सुरू राहिल्यास येत्या 2 ते 3 दिवसात धरण 100 टक्के भरेल. ( Ahmednagar Mula dam )
नगर जिल्ह्यातील भंडारदरा हे धरण 100 टक्के भरले असून त्यातून प्रवरा नदीत 8000 क्युसेक ने पाणी सोडले आहे. पावसाचा जोर वाढल्यास त्यात अजून वृद्धी होईल. (Bhandardara Dam )
नगर जिल्हयासाठी आनंदाची बातमी भंडारदरा धरण १००% भरले ! विसर्ग सुरू
महाराष्ट्रात या भागात 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार अतिमुसळधार पाऊस
शेतीविषयी माहिती आणि बातम्या साठी आताच टेलिग्राम चॅनल जॉइन करा