भंडारदरा ( bhandardara Dam ) धरण १०० % भरले
अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात दोन मोठी धरणे आहेत. सध्या मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे. मुळा धाराची साठवण क्षमता 26 TMC तर भंडारदरा डॅम ची क्षमता 11 TMC आहे. अशीच जोरदार पर्जन्यवृष्टी चालू राहिल्यास मुळा धरण येत्या 4 ते 5 दिवसात भरण्याची शक्यता आहे.( mula dam)
नगर जिल्हयाच्या उत्तर भागासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्चन्यमानामुळे धरणात 3000 ते 4000 ने आवक सुरू आहे. धरण आज दि.१२/०९/२०२१ रोजी दुपारी १००% भरले आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता भंडारदरा धरणातून प्रवारा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
महाराष्ट्रात या भागात 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार अतिमुसळधार पाऊस
धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या लोकांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता अहमदनगर पाटबंधारे विभाग यांचे कडून करण्यात आले आहे