अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना सुवर्णसंधी, आधार कार्डला मोबाईल नंबर लिक नसल्यास तुमच्यासाठी विशेष मोहीम. पोस्ट खात्यात आधारला मोबाईल लिंक करता येणार.
आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्यामुळे नागरीकांना अनेक अडचणी येतात, हे पाहून पोस्ट खात्याने 28 व 29 सप्टेंबर रोजी अहमदनगर डाक विभागातील प्रत्येक टपाल कार्यालयात आधार कार्डला मोबाईल लिंक करण्या साठी विशेष मोहीम आयोजित केली आहे. (adhar link)
28 व 29 रोजी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या भागातील जवळील पोस्ट खाते किंवा पोस्टमनशी संपर्क साधावा. लोकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जावे.
या व्यतिरिक्त आणखी कोणतेही कागदपत्रे लागत नाही. यासाठी शुल्क फक्त 50रु आहे. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर डाक विभागाने केले आहे.
हे पण वाचा