(Operation Green Scheme 2021, Eligibility, Official Website)ऑपरेशन ग्रीन योजना 2021, ऑनलाइन अर्ज, पात्रता, अनुदान.
शेतकर्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने शेतमाल वाहतूक आणि साठवणुकीसाठी ऑपरेशन ग्रीन (operation Green) अनुदान ही योजना आधीच लागू केलेली आहे. आता अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MOFPI) अलीकडेच टोमॅटो, कांदा आणि बटाटा तसेच ईतर हिरव्या भाज्या आणि फळे यांचाही समावेश यात केला आहे. शेतमाल वाहतूक आणि साठवणुकीसाठी खर्चाच्या 50 टक्के अनुदान मिळते. ही योजना अंतिम टप्प्यात असून 2022 ला मुदत संपत आहे.
ऑपरेशन ग्रीन योजनेचा उद्देश
शेतकर्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळत नाही. वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच लॉकडाऊनमुळे फळे आणि भाजीपाला उत्पादकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे.
ऑपरेशन ग्रीन योजनेत कोणती पिके येतात
फळे- आंबा, केळी, पेरू, किवी, लिची, पपई, लिंबूवर्गीय, अननस, डाळिंब, काकडी; भाज्या: - फ्रेंच बीन्स, कडू, वांगी, शिमला मिर्च, गाजर, फुलकोबी, मिरची (हिरवी), भेंडी, कांदा, बटाटा आणि टोमॅटो. इतर कोणतेही फळ/भाजीपाला भविष्यात कृषी मंत्रालय किंवा राज्य सरकारच्या शिफारशीच्या आधारे जोडले जाऊ शकते.
ऑपरेशन ग्रीन योजना पात्रता लाभार्थी
- फूड प्रोसेसर
- शेतकरी उत्पादक संस्था
- वैयक्तिक शेतकरी
- निर्यातदार
- राज्य विपणन/सहकारी महासंघ
- किरकोळ विक्रेते
ऑपरेशन ग्रीन योजनेत अनुदान किती
शेतमाल, फळे, भाजीपाला वाहतुकीच्या खर्चाच्या 50 % सबसिडी दिली जाईल तसेच साठवणूकी साठी आलेल्या खर्चाच्या 50टक्के अनुदान दिले जाईल. (जास्तीत जास्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी)
अनुदानासाठी पात्र लाभार्थी अधिसूचित पिकांची वाहतूक आणि/किंवा साठवण करू शकतात आणि त्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर त्यांचा अर्ज सादर करू शकतात (Online Portal).
योजनेचे नाव | ऑपरेशन ग्रीन योजना |
योजना कोणाची | केंद्र सरकार |
लाभार्थी | शेतकरी ,संस्था |
संपर्क | www.sampada-mofpi.gov.in |
ऑनलाइन अर्ज लिंक
https:/ /www.sampada-mofpi.gov.in/Login.aspx.
हेल्पलाइन नंबर- 011 2640 6557, 2640 6545, 93118 94002
support-fpi@nic.in
FAQ
Ans : केंद्र सरकार (Central Government)
Ans : कांदा, बटाटा आणि टोमॅटो सारखी भाजीपाला संरक्षण देणे आणि उत्पादन वाढवणे
Ans : 2022 पर्यन्त.
हे पण वाचा-