ई पीक पाहणी नोंदवा नाहीतर होणार हे नुकसान ( epik pahani )
चालू वर्षी पासून महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांना घरबसल्या मोबाइल वरुन ई पीक पाहणी करण्यास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वर्षातील खरीप पिकाची नोंदणी करण्यासाठी 15 सप्टेंबर ही शेवट तारीख होती.
परंतु ही पीक पाहणी शेतकर्यांना डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्कची असलेली अडचण तसेच मुसळधार पाऊस या सारख्या अनेक गोष्टींमुळे बर्याच शेतकर्याची पीक पाहणी अजून बाकी आहे .
हे पाहून सरकारने 30 सटेंबर 2021 पर्यंत मुधत वाढ दिलेली आहे. तरी सर्व शेतकर्यांनी लवकरात लवकर आपली पीक पाहणी करून घ्यावी.
ई पीक पाहणी न केल्यास काय होईल
- शेत जमीन ही पडीक समजली जाईल. ( waste land )
- पिककर्ज मिळण्यासाठी अडथळे येतील. ( crop loan )
- नुकसान भरपाई मिळणार नाही. ( crop insurance )
- शासनाच्या अनेक योजना पासून वंचित राहू शकता
ई पीक पहाणीची नोंद न केल्यास शेतकर्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. शेती पडीत आहे किंवा पेरणी झालेली नाही असे समजले जाईल.
तसेच नैसर्गिक आपतीमुळे नुकसान झाल्यास भरपाई, पीक विमा ( insurance ) परतावा व ईतर आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता कमी आहे.
चला तर मग आपणच आपली ई पीक पाहणी करूया. एका मोबाइल नंबर वरुन आपण जास्तीत जास्त 20 खातेदारांची माहिती भरू शकतो.
" माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिकपेरा."