घोडेगाव कांदा बाजारभाव 2700 रुपये झाला.
बुधवारी झालेल्या कांदा लिलावात नेवासा कृषि उत्पन्न बाजार समिती, घोडेगाव येथे एक नंबर कांद्याला 2700 रुपये भाव मिळाला आहे. राज्यात मागणीपेक्षा कांद्याची आवक कमी झाली आहे.
बर्याच दिवसापासून कांद्याला 1500 ते 2000 रुपये प्रती क्विंटल भाव मिळत होता, कांदा खराब होत असल्याने मिळेल त्या भावात शेतकर्यांना कांदा विकावा लागत होता.
चालू वर्षी शेतकार्यांना महाग बियाणे ,रोपे, लागवड खर्च, मशागत, रसायनिक खते भाववाढ, वाहतूक खर्च हा तुलनेने खूप झाला आहे. यामुळे लोकांना चांगल्या भावाची अपेक्षा होती.
आपल्या शेजारील राज्यातून कांद्याला मागणी वाढत आहे आणि नवीन कांदा बाजारात येण्यास बराच अवधि आहे त्यामुळे कांदा दरात वाढ झाली असून शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा-नाशिक मधील गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरण पाणीसाठा
मोदी सरकारची नवीन योजना, पहा काय आहे