1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना.1 to 50 lakh incentive scheme.
योजनेचे नाव --मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}
महाराष्ट्र शासन ( Maharashtra )
उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू)
काय आहे योजना?
राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे
योजनेचे संकेतस्थळ :- https://maha-cmegp.gov.in/
योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र
योजनेचे निकष :-
1) वयोमर्यादा 18 ते 45
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
2) शैक्षणिक पात्रता
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख
प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त 20%
(iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त 30%
5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%.
6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
7) *सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे तसेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे
पात्र मालकी घटक :- वैयक्तिक , भागीदारी, बचत गट
9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र पहाण्यासाठी, वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत
5% - 10% स्वतःचे भांडवल
60% - 80% बँकेचे कर्ज ( Loan )
30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
20% SC/ST साठी अनुदान राखीव
एक कुटुंब एक लाभार्थी
हे पण वाचा